रक्तदान ही चळवळ व्हावी: रूपाली चाकणकर अजितदादा युथ फौंडेशन च्या रक्तदान शिबिरास युवकांचा प्रतिसाद
बारामती: प्रतिनिधी
रक्तदान करताना कुठलेही धर्म जात पाहिले जात नाही, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, प्रत्येक व्यक्तीस जीवनात कधी ना कधी रक्ताची गरज पडत असते, रक्ताची गरज भागवण्यासाठी सर्वत्र रक्तदान ही चळवळ व्हावी असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला प्रदेश अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केले.
अजित दादा युथ फाऊंडेशन यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होत (शुक्रवार दि.२५ जुलै)
याच्या उद्घाटन प्रसंगी चाकणकर बोलत होत्या.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्ष निर्मला नवले, बिग बॉस फेम अभिनेता सुरज चव्हाण, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे ,राष्ट्रवादी च्या अनिता गायकवाड, ज्योती लडकत ,अविनाश बांदल, वंजारवाडी चे सरपंच जगन्नाथ वनवे,उद्योजक प्रा शशिकांत चौधर, दिलीप भापकर, प्रा अजिनाथ चौधर व इतर मान्यवर उपस्तीत होते.
रक्तदान शिबिर घेणे हे कौतुकास्पद असल्याचे निर्मला नवले यांनी सांगितले. रक्तदान करा व मैत्री वाढवा सांगत सुरज चव्हाण याने विविध डायलॉग बाजी करत उपस्थित त्यांची मने जिंकली.
महाराष्ट्रात कोणालाही कधीही कोणत्याही गटाचे रक्त पाहिजे असल्यास आम्ही ते उपलब्ध करून देत असतो व रक्ताच्या माध्यमातून माध्यमातून अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी अजितदादा युथ फाऊंडेशने पुढाकार घेतला असल्याचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांनी सांगितले.
अजितदादा युथ फाऊंडेशनच्या कार्याचा आढावा प्रा. शशिकांत चौधर यांनी घेतला.
या प्रसंगी सर्वात जास्त रक्तदान करणारे पुरुष, महिला व युवकांचा यांचा सत्कार करण्यात आला.
२७१२ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.
उपस्तितांचे स्वागत शिवाजीराव माने,सचिन घाडगे, अरविंद काळे,सुभाष चौधर,संदीप पन्हाळे यांनी केले सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले व आभार राहुल चौधर यांनी मानले.























