अमोल सरिता अनिल गायकवाड (उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश – केसनंद गावाला मिळणार दर्जेदार वीजपुरवठा
हवेली तालुका प्रतिनिधी
केसनंद ( ता हवेली) – पुणे महानगरपालिकेच्या हद्दीलगत असलेल्या केसनंद गावात गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक वीज पुरवठ्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जात होते.गावातील
नागरीकसंख्या,गुंतवणूकदार व व्यावसायिकांची वाढ,तसेच बिल्डर्सकडून झालेल्या प्रचंड विकासकामांमुळे विद्यमान वीज वितरण केंद्रांवर (डीपी) क्षमतेपेक्षा जास्त भार पडत होता.
यामुळे गेल्या ५–७ वर्षांपासून वारंवार फ्युज उडणे, अपुरा वीज पुरवठा, शेतकऱ्यांना मोटार चालवण्यासाठी रात्रीच्या वेळी पाणी द्यावे लागणे, तसेच घरगुती व व्यावसायिक उपकरणे नीट चालत नसणे अशा असंख्य अडचणी निर्माण झाल्या होत्या. नागरिक पूर्ण वीजबिल भरूनही समाधानकारक सेवा न मिळाल्याने संताप वाढत होता.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमोल सरिता अनिल गायकवाड यांनी सातत्याने मागणी लावून धरली. गेल्या चार महिन्यांपासून त्यांनी महाराष्ट्र विदयुत वितरण वितरण कंपनी (MSEDCL) पुणे परिमंडळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून हे काम अंतिम टप्प्यात आणले आहे.
सी एस के एंटरप्रायजेस श्री अनिल कोतवाल यांच्या मार्फत लवकरच हे काम पूर्ण होऊन केसनंद गावाला पाच वर्षांपासून अपूर्ण असलेला विदयुत पुरवठा आता दर्जेदार व अखंड वीजपुरवठा मिळणार आहे.




















