Homeताज्या बातम्याआगामी गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा याअनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी पुणे...

आगामी गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा याअनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी पुणे विभागातील १८ पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे १२८ श्री गणेश मंडळाचे अध्यक्षांची आढावा बैठक घेतली.

आगामी गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा याअनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी पुणे विभागातील १८ पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे १२८ श्री गणेश मंडळाचे अध्यक्षांची आढावा बैठक घेतली.

सह्याद्री टाईम न्युज प्रतिनिधी

आगामी गणेशोत्सव २०२५ चे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेकरीता पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक साो, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक साो यांनी पुणे विभागातील लोणावळा, खेड, जुन्नर, शिरूर उपविभागातील १८ पोलीस स्टेशनचे हद्दीतील १२८ श्री गणेश मंडळांचे अध्यक्ष, संबंधित गावातील पोलीस पाटील तसेच पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांची पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण, चव्हाणनगर येथील भिमाशंकर हॉल येथे दि. १४/०८/२०२५ रोजी आढावा बैठक घेण्यात आली आहे.

तसेच सदर बैठकीस विविध विभागातील मा. जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, राज्य उत्पपादन शुल्क विभाग, बी.एस.एनए.एल.पुणे, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्य वनरक्षक विभाग इत्यादी विभागांचे प्रतिनिधि हजर होते.

आगामी गणेशोत्सव शांततेत, निर्विघ्न पार पडावा तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता पुणे ग्रामीण पोलीस दल पुर्णतः सुसज्ज असलेबाबत गणेश मंडळांना सुचीत करणेत आले. त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल यांनी गणेश मंडळाचे अध्यक्षांना प्रत्येक मंडळाचे ठिकाणी किमान ०४ सी.सी.टी.व्ही. बसवावेत, मंडळाचे वतीने सामाजिक उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करावे, मंडळाचे परिसरात त्याचप्रमाणे गाव परिसरात कोणत्याही प्रकारे कचरा होणार नाही, अशा प्रकारे सुचना देवून मंडळाचे ठिकाणी स्वयंसेवक नेमणे, किमान दोन सदस्य रात्रीचे वेळी गणपती मंडळात गणपती मुर्तीचे देखभाल करीता हजर राहतील, कर्णकर्कश व मोठ्या प्रमाणात आवाज करणारे ध्वनीक्षेपक वापरू नयेत, अवांतर खर्च वाढविणेपेक्षा त्याचा सामाजिक उपक्रमाकरीता विनीयोग करावा. कोणत्याही प्रकारे वर्गणी, देणगी करीता जबरदस्ती केली जाणार नाही, लेझर लाईट शो चा वापर टाळावा, झाडे लावा, बालविवाह व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करावी, शारिरीक क्षमता तंदरूस्त रहावी या दृष्टीकोनातून खेळाच्या स्पर्धांचे आयोजन करावे, कोणत्याही प्रकारे महिलांसंबंधित छेडछाड अगर इतर प्रकारच्या घटना घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अशा विविध सुचना देण्यात आल्या.

त्याचप्रमाणे पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे साो यांनी गणेश मंडळाचे अध्यक्ष यांना त्यांच्या अडचणी विचारून घेवून पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल्ल यांनी त्या अडचणींचे त्याच ठिकाणी निवारण करत भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणींकरीता पोलीस दलाशी संपर्क करणेबाबत सुचीत केले आहे. गणेश मंडळांनी ऑरपेशन सिंदुर व देशभक्तीचे देखावे सादर करावेत. वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. विसर्जन मिरवुणकी दरम्यान मंडळाचे सदस्यांनी आपापले मंडळाची मिरवणुक निर्विघ्न पार पडेल याची दक्षता घेवून विसर्जन घाटावर योग्य नियोजन करावे, लहान मुले नदीपात्राकडे जाणार नाहीत याची काळजी घेवनू निर्माल्य हे नदीपात्रात विसर्जित करू नये. अशा प्रकारच्या सुचना करत शासनाकडून निर्गमित होणारे आदेशांचे पालन करावे, तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई करणेत येईल अशा सुचना केल्या.

पोलीस दलाचे आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देवून वृक्षारोपन करणे, सीसीटीव्ही बसविणे, खेळाच्या स्पर्धा घेणे, कर्णकर्कश ध्वनीक्षेपकांचा वापर न करणे, लेझर लाईट शोचा वापर न करणे, यासाठी पुढाकार घेणारे गणेश मंडळाचे अध्यक्षांचा पुणे ग्रामीण पोलीस दलाचे वतीने गुलाब पुष्प देवून स्वागत करणेत आले. बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांना गणेशात्सवासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776630779.5eda112b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776612712.5d6017ce Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776594628.5c090488 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776576538.5afcc976 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776558483.5a954a11 Source link

error: Content is protected !!