आळंदी येथील म्हातोबा जोगेश्वरी मंदिर देवस्थानच्या पालखी मार्गाचे भुमिपूजन संपन्न.
मौजे आळंदी म्हातोबा, ता. हवेली, जि. पुणे येथे, थेऊर ग्रामपंचायत सदस्य आरोग्यदूत युवराज हिरामण काकडे यांच्या माध्यमातून, श्री म्हातोबा जोगेश्वरी मंदिर पालखी मार्ग रस्ता सुधारणा करणे, या १० लक्ष रू कामाचा भूमिपूजन समारंभ काल मंगळवार दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडला.
गेली अनेक वर्षांपासून या पालखी मार्गाचे काम प्रलंबित होते. येथील ग्रामस्थांनी याबाबत युवराज काकडे यांच्याकडे मागणी केली होती. ही मागणी तात्काळ मान्य करून युवराज काकडे यांनी १० लक्ष रू निधी उपलब्ध करून दिला.
या प्रसंगी आरोग्यदूत युवराज काकडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना, आळंदी गावच्या भविष्यातील महत्त्वाच्या विकासकामांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगितले. यामध्ये गावासाठीची ड्रेनेज लाईन STP योजना, कुंजीरवाडी- आळंदी मुख्य रस्ता, म्हातोबा मंदिर पुढील काळात (क) वर्गात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न, मल्हारगड पर्यटन क्षेत्र म्हणून विकास, विठ्ठल मंदिराजवळील नाला खोलीकरण, आरोग्य विषयक उपक्रम अशा विविध विकासकामांच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे युवराज काकडे यांनी सांगितले.
यावेळी युवराज काकडे यांनी आळंदी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास पुढील वर्षभर पुरतील येवढी, १ लक्ष रुपयांची गोळ्या औषधे उपलब्ध करून दिली. तसेच गावातील नागरिकांच्या आरोग्याविषयी सर्व चांगल्या सेवा सुविधा पुढील काळातही उपलब्ध करून देण्याबाबत सांगितले.
कार्यक्रमास दिलीप वाल्हेकर, अशोक जवळकर, संदेश आव्हाळे, भगवान जवळकर, मोहन जवळकर, दत्तात्रय जवळकर, शंकर जवळकर, वाल्मिक जवळकर, रतन झेंडे, भाऊसाहेब कुंजीर, संदीप पवार, श्रीपाद जवळकर, राजेश जवळकर, तेजस शिवरकर, गणेश जवळकर, योगेश जवळकर, राहुल जवळकर, अमित पवार, सागर पवार, ज्ञानेश्वर जवळकर, बाळासाहेब शिवरकर, विजय सुर्वे, गणपत जवळकर, कैलास खटाटे, दयानंद शिवरकर, दशरथ जवळकर, सखाराम जवळकर, श्रीहरी काळभोर, योगेश काकडे, प्रतिक शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या भुमिपूजन सोहळ्याच्या माध्यमातून, गावच्या सर्वांगीण विकासाची ही महत्वाची शिदोरी असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त करून, युवराज काकडे यांचे आभार मानले.




















