कर्तव्यदक्ष अधिकार
IAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली!21 वर्षात 24 बदल्या! बोगस दिव्यांग प्रमाणपत्र नुसार कार्यवाही केल्या नंतर पुन्हा बदली…
झाली, तुकाराम मुंढे यांची २१ वर्षांतील 24 वी बदली झाली…
केवळ कडक शिस्तीचे आणि धडाकेबाज अधिकारी म्हणून नव्हे तर सतत बदली होणारे अधिकारी अशी ओळख प्राप्त झालेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची वर्षभराच्या आतच पुन्हा बदली झाली आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असलेले मुंढे यांच्याकडे आता राज्य अपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मदत, पुनर्वसन विभाग व महसूल आणि वनविभाग अशी तीन विभागांच्या सचिवपदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. अलीकडेच त्यांनी बोगस दिव्यांग शोध मोहीम अधिक तीव्र केली होती. त्याला यश येण्यापूर्वीच मुंढे यांची तेथून बदली करण्यात आली आहे.
अर्थात मुंढे यांच्या बाबतीत हे नवीन नाही. २००५ बॅचचे आय़एएस अधिकारी असलेल्या मुंढे यांची २१ वर्षांतील ही २५ वी बदली आहे. त्यांच्या या बदल्या अनेकदा प्रशासकीय शिस्त आणि राजकीय दबावाच्या पार्श्वभूमीवर होतात. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी त्यांच्या अशा पद्धतीने दल्या झाल्याची उदाहरणे आहेत. सुरवातीला त्यांची बदली झाल्यावर तेथील नागरिक सरकारच्या विरोधात आंदोलने करीत असत. आता मात्र, अशी आंदोलनेही होताना दिसत नाहीत.
तुकाराम मुंढे २००५ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म ३ जून १९७५ रोजी म बीड जिल्ह्यातील ताडसोना या छोट्याशा गावात झाला. ते ओबीसी वर्गातील आहेत. त्यांचे वडील शेतकरी होते. १९९६ मध्ये त्यांनी बीएची पदवी घेतली. त्यानंतर एमए केले. पुढे २००५ मध्ये ते यूपीएससी उत्तीर्ण झाले. त्यांची पहिली पोस्टिंग सोलापूरमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून होती. तेव्हापासूनच त्यांनी कामाचा धडका सुरू केला आणि त्यांच्या बदल्यांचाही सिलसिला सुरू झाला.






















