काम थांबवण्याच्या PMC आदेशाला ठेकेदाराकडून धुडकावणी – अमीर शेख पत्रकार यांना धमकी देत असून कारवाई नाही!
पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे महानगरपालिकेच्या कृष्णा नगर मोहम्मद वाडी येथील स्मार्ट केबल संबंधित विभागाकडून थेट आदेश देऊन देखील एका बांधकाम प्रकल्पातील काम तात्काळ थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र या आदेशाला ठेकेदाराकडून सरळ सरळ धुडकावून संबंधित बांधकाम बेकायदेशीररित्या सुरू ठेवण्यात आले असून, याप्रकरणी PMC च्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सदर ठिकाणी नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार PMC कार्यालयाशी संपर्क साधून काम थांबवण्याची मागणी केली होती. तरीही काम सुरुच राहिले. विशेष म्हणजे, जबाबदार अधिकाऱ्यांकडे तक्रार करताच काही अधिकाऱ्यांनी तक्रारदारांना उलट धमकावल्याची माहिती समोर आली आहे. हे अत्यंत गंभीर असून अधिकाऱ्यांचा ठेकेदारांशी संगनमताचा संशय व्यक्त केला जात आहे.
तक्रारदारांनी सांगितले की, “काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकामाच्या ठिकाणी कोणतेही सुरक्षात्मक उपाय किंवा योग्य देखरेख नाही. एवढं सगळं समजून सुद्धा PMC चे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.”
स्थानिक नागरिकांनी आता लेखी तक्रारी PMC आयुक्तांकडे सादर केल्या असून, काम थांबवण्याच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदारावर तसेच दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदाराचे कंत्राट रद्द करावे, संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय कारवाई करावी आणि नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार नागरी सेवा मिळावी यासाठी त्वरीत निर्णय घेणे आवश्यक आहे, अशी भूमिका सामाजिक संघटनांनी घेतली आहे.























