पशुपालन व्यवसायास ‘कृषी’चा दर्जा पंकजा मुंडे यांची घोषण
मुंबई प्रतिनिधी
मुंबई, ता. ११ : राज्यातील पशुपालन व्यवसायास कृष व्यवसायाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या निर्णयामुळे राज्यातील पशुपालन व्यवसायास कृषी व्यवसायाप्रमाणे सर्व सवलतींचा लाभ यापुढे मिळू शकणार आहे..
पशुपालकांना मिळणाऱ्या सवलती वीज दर आकारणी
कृषी वर्गवारीप्रमाणे करण्यात येणार ग्रामपंचायत कर दरात एकसमानता आणून कृषी व्यवसायाप्रमाणे कर आकारणी पशुपालन व्यवसायास पंजाबराव देशमुख व्याज सवलत’ योजनेच्या धर्तीवर कर्जावरील व्याज दरात सवलत कृषी प्रमाणे कुक्कुटपालन व
इतर पशुसंवर्धन व्यवसायासाठी सोलर पंप व इतर सोलार संच उभारण्यास सवलत पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी याबाबत विधानसभेत शुक्रवारी घोषणा केली.
देशातील काही राज्यात पशुसंवर्धन व्यवसायास मोजक्या स्वरूपाच्या सवलती देण्यात येत आहे. मात्र महाराष्ट्रात कृषी उद्योगाला मिळणाऱ्या सर्व सवलती देण्यात येणार आहेत. राज्यातील ७६ लाख ४१ हजार पशुपालक कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे.
तर या निर्णयामुळे पशुजन्य उत्पादनातून सुमारे सात हजार ७०० रुपयांची वाढ होणार आहे.
राज्याच्या सकल उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा १२ टक्के असून कृषी क्षेत्राच्या उत्पन्नात पशुजन्य उत्पन्नाचा वाटा २४ टक्के आहे. राज्यातील पशुजन्य उत्पन्नाचा विचार करता भारतीय आरोग्य परिषदेने दैनंदिन आहारात शिफारस केलेल्या प्रमाणाएवढी अंडी व मांस उपलब्ध होत
नाही. तसेच दुग्ध उत्पादनातराज्यातील पशुधनाची उत्पादनक्षमता इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. निती आयोगाच्या २०२१ च्या अहवालामध्ये पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये नियोजनपूर्वक व शास्त्रीय पद्धतीचे व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष होत
असल्याने उपाययोजना करून शेतकरी किंवा पशुपालकांच्या आर्थिक जोखीम कमी करण्याची शिफारस केली आहे. या पार्श्वभूमीवर पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्याचे धोरण सरकारने ठरविले आहे.पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रिमंडळाने काल हा निर्णय घेतला आहे.
यानुसार पशुपालन व्यवसायास कृषी व्यवसायाचा दर्जा दिला आहे. या निर्णयामुळे राज्यातील व्यवसायास व्यवसायाप्रमाणे पशुपालन कृषी वीज दर आकारणी कृषी वर्गवारीप्रमाणे करण्यात येणार आहे.




















