प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने तहसील कार्यालयासमोर हालगी नाद आंदोलनाचा इशारा.
मुख्य कार्यकारी संपादक : सोलापूर कुंदन वजाळे 9923275866…..मागील काही दिवसांपासून माढा तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात झालेल्या नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने हालगी नाद आंदोलनाचा इशारा. माढा तालुक्यातील मागील काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे फळबागा आणि शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यात प्रामुख्याने डाळिंब, द्राक्षे, केळी, उन्हाळी कांदा, भुईमूग तसे भाजीपाला याच बरोबर इतर पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्याच बरोबर अनेक घरांची पडझड झालेली आहे. तसेच बरेच पशुधन दगावले आहे. वीज पडून मनुष्य हानी ही झालेली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. तरी त्वरित सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकारने आधार द्यावा असे पत्र माढा चे प्रभारी तहसीलदार शिल्पा ठोकळ मॅडम यांना देण्यात आले. अन्यथा प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने 5 जून रोजी आपल्या कार्यालयासमोर हालगी नाद आंदोलनाचा इशारा प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने देण्यात आला आहे.*
*त्या प्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके, तालुका अध्यक्ष अमोल केसरे, बिरुदेव शेळके, राजाभाऊ शिंदे, बालाजी माळी, युवराज तांबीले, बालाजी नाईकवाडे, माणिक भुसारे, कुंदन वंजाले, महेश भुसारे , महादेव लोखंडे, योगेश घोरपडे यांचे सह अनेक कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.*























