बारामती येथे झालेल्या लोकअदालतमध्ये विविध विमा कंपन्यांकडून अर्जदारांना एकूण एक कोटी शहात्तर हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आल्याची माहिती अॅड. विशाल बर्गे यांनी दिली.
बारामती तालुका प्रतिनिधी
66 या लोकअदालतमध्ये एचडीएफसी विमा कंपनीतर्फे मोटार वाहन अपघाताशी संबंधित दोन प्रकरणांत एकूण ५८ लाख ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई अर्जदारांना देण्यात आली. यातील पहिल्या प्रकरणात अर्जदार सुमित्रा जाधव यांना पतीच्या अपघाती मृत्यूबाबत दाखल प्रकरणात तडजोडी अंतर्गत २७लाख ५० हजार रुपयांची भरपाई मंजूर झाली.
तर दुसऱ्या प्रकरणात अर्जदार ज्योती ताठे यांना ३१ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली.























