Homeताज्या बातम्याबीडमध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून... जीएसटी विभागातील अधिकार्याची आत्महत्या

बीडमध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून… जीएसटी विभागातील अधिकार्याची आत्महत्या

बीडमध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून…जीएसटी विभागातील अधिकार्याची आत्महत्य

बीड । प्रतिनिधी

येथील जीएसटी विभागात कार्यरत एका अधिकाऱ्याचा मृतदेह सोलापूर – धुळे महामार्गालगत कपीलधार रोडवर शनिवारी (दी. १७) दुपारी एका टपारी कारमध्ये आढळला. या अधिकाऱ्याचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे शवविच्छेदन अहवालामध्ये समोर येणार असले तरी त्यांच्या खिशामध्ये सुसाईड नोट आढळली. त्यामध्ये वरिष्ठांचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे

. यातील एका अधिकार्याला बीड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सचिन जाधवर (३५, रा.चुंब, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. सचिन जाधवर हे बीड येथील जीएसटी विभागात कार्यरत होते. शुक्रवारी ते ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडले ते रात्री उशीरापर्यंत घरी पोहचले नव्हते. मित्र व नातेवाईकांनी शोधाशोध केली तसेच पोलिसात तक्रार देखील देण्यात आली. या दरम्यान सोलापूर-धुळे महामार्गालगत कपीलधार रोडवर एका कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. या ठिकाणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सपोनि बाळराजे दराडे यांच्यासह कर्मचार्यांनी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर जाधवर यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला.

ङ्जाधवर यांच्या खिशामध्ये सुसाईड नोट आढळली असून यामध्ये बीड येथीलच जीएसटी विभागात कार्यरत वरिष्ठ अधिकार्याचे नाव आहे. त्या अधिकार्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी केली जात आहे.

सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे; एकाला घेतले ताब्यात

सचिन जाधवर यांनी पुस्तकेही लिहिली

बीड येथील जीएसटी ऑफिस मध्ये राज्य कर अधिकारी असलेले सचिन जाधवर हे मूळचे चुंब (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील रहिवासी आहेत. जाधवर हे बीएससी एंग्री बायोटेक आणि एम ए इंग्लिश होते. सन २०१२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून त्यांची एसटीआय पदी नियुक्ती झाली

होती. यु ट्युबच्या चॅनलच्या माध्यमातून लाखो विद्याथ्यांना त्यांनी इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन केलेले आहे. विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांवर देखील त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. सचिन जाधवर यांनी त्या अनुषंगाने पुस्तके देखील लिहिलेली आहेत.

गाडीमध्ये आढळले कोळसा अन् गाडगे

जाधवर यांची कार ही वर्दळ नसलेल्या रस्त्यावर थांबवलेली आढळली. त्यांची गाडी आतून लॉक करण्यात आलेली होती. या गाडीमध्ये एक मडके व त्यामध्ये कोळसा देखील आढळला आहे. मडक्यामध्ये कोळसा देखील पेटवण्यात आला होता. त्याचा धूर झाल्याने गुदमरुन जाधवर यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

वरिष्ठांकडे केली होती तक्रार

जाधवर यांना गेल्या अनेक महिन्यांपासून संबंधीत बरिष्ठ अधिकार्याकडून त्रास दिला जात होता. त्याबाबत त्यांनी चरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार देखील केली होती, त्याची दखल जर वेळीच घेतली गेली असती तर जाधवर यांच्याबर आत्महत्येची वेळ आली नसती. दरम्यान, बीडमधील कार्यरत या अधिकार्याची बदली जालना येथे झाली होती, तरी देखील तो बीडमध्येच कार्यरत होता, बदली झालेली असतांनाही तो कसा काय बीडमध्ये कार्यरत राहू शकत होता, असा सवाल आता नातेवाईकांनी केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1773372298.55bac630 Source link

टॉम्ब रायडर (iOS) पुनरावलोकन: फेरल लारा क्रॉफ्टच्या रक्तरंजित साहसाला जवळच्या निर्दोष बंदरात मोबाईलवर आणते

फेरल इंटरएक्टिव्हचे पोर्ट ऑफ टॉम्ब रायडर ते iOS हे आधुनिक मोबाइल युगासाठी कन्सोल क्लासिकचे पुनरुज्जीवन कसे करावे यासाठी एक मास्टरक्लास आहे. हे लारा क्रॉफ्टची...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1773336194.53533416 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1773317852.51ba8abb Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1773299733.4ffb4b1b Source link

error: Content is protected !!