महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजित दादा पवार
यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात नैपुण्यपूर्ण यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौर
थेऊर प्रतिनिधी
समारंभ तसेच भव्य वृक्षारोपण व वृक्ष वाटप समारंभ नुकताच पार पडला.
यावेळी श्री चिंतामणी विद्या मंदिर थेऊर, व यशवंतराव चव्हाण मेमोरियल इंग्लिश स्कूल, थेऊर या शाळांमधील इयत्ता दहावी व इयत्ता बारावी च्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केल्याबद्दल त्यांचा व त्यांच्या पालकांचाही सन्मान करण्यात आला.
यशवंतराव चव्हाण मेमोरियल इंग्लिश स्कूल मधील इयत्ता दहावीचे विद्यार्थी,प्रथम क्रमांक,कु.राजेश्वरी खेडकर.द्वितीय क्रमांक, सार्थक शितोळे. तृतीय क्रमांक,पठाण जुनेद या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले.तसेच
श्री चिंतामणी विद्या मंदिर शाळेमधील इयत्ता दहावीचे विद्यार्थी,प्रथम क्रमांक,पडळकर ज्ञानेश्वरी द्वितीय क्रमांक पडळकर मयुरी,तृतीय क्रमांक,आत्तार सलमा. तसेच
बारावीचे विद्यार्थी, प्रथम क्रमांक, चव्हाण अंजली, द्वितीय क्रमांक,माळी वैभवी तृतीय क्रमांक,कांबळे प्रणाली यांनी देखील यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच दोन्ही शाळांमध्ये उपस्थित राहिलेल्या मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमा वेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन,श्री.किशोर उंद्रे, अण्णासाहेब मगर स्मारक शिक्षण निधी ट्रस्ट चे अध्यक्ष,श्री.मोरेश्वर काळे, शालेय समिती सदस्य,श्री. विजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश सरचिटणीस पै. आबासाहेब काळे, नायगावचे सा.का.श्री. चंद्रकांत चौधरी,राम कृष्ण हरी पतसंस्थेचे संचालक श्री.दत्तात्रय तांबे,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री.बाप्पू सोनवणे राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक अध्यक्ष,श्री.महबूब सय्यद शाळेच्या वतीने समन्वयक श्री.जीवन शिंदे सर,पर्यवेक्षक जठर सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख, सौ.नरवणे मॅडम सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमावेळी आदर्श शाळा म्हणून श्री चिंतामणी विद्यामंदिर व यशवंतराव चव्हाण मेमोरियल इंग्लिश स्कूल या शाळेचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक श्री. राजाराम काकडे सर व मुख्याध्यापक वाघमारे मॅडम यांचा देखील सन्मान करण्यात आला.























