श्रीक्षेत्र थेऊर मध्ये नोव्हेंबर महिन्यात यशवंत कृषी महोत्सवाचे आयोजन
श्रीक्षेत्र थेऊर प्रतिनिधी
आज मा.ना.श्री.अजित दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते यशवंत कृषी महोत्सव च्या पोस्टर चे अनावरण करण्यात आले.अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.पै.दत्तात्रय उर्फ आबा काळे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई महापौर केसरी यांनी दिली.
दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने २० नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर रोजी श्री यशवंत सहकारी साखर कारखाना शेजारील मैदानावर यशवंत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.या प्रदर्शनात कृषी, औद्योगिक, गृहोपयोगी वस्तू अॅटोमोबाईल शेतकी अवजारे व त्याचबरोबर राज्यस्तरीय पशूपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.तरी सदर प्रदर्शनात सर्व शासकीय संस्थांना निमंत्रीत करुन सहभागी करून घेतले जाणार आहे.
तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे
सामाजिक प्रतिष्ठान च्या माध्यमा तुन अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.. यातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बैलांचा रॅम्प वॉक केला.प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित केलेल्या महिला सक्षमीकरण कार्यशाळा घेतल्या महिलांना उद्योजक विकास प्रशिक्षण दिले
त्यांनी तयार केलेल्या वस्तू ला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र खरेदी जत्रा भरवली शालेय शिक्षण करण्या-या गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
आरोग्य शिबीर मध्ये रुग्णाला तपासणी करून देणे ते शस्त्रक्रिया शिबीर पर्यंत मदत केली.त्यासाठी प्रतिष्ठान ने आरोग्य महायज्ञ भव्य आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले रेशनकार्ड दुरूस्ती आधार कार्ड नोंदणी शिबीर आयोजित केले.
सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम हाती घेऊन आजही प्रतिष्ठान कार्यरत आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून कार्यरत आहे




















