इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी अमोल भोईटे यांची बिनविरोध निवड.
इंदापूर तालुका प्रतिनिधी
इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी अमोल भोईटे व उपाध्यक्षपदी विष्णुपंत देवकाते यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी खरेदी-विक्री संघाचे संचालक प्रतीक घोगरे, मकरंद जगताप, कैलास येरळकर, हरिदास जाधव, सचिन जाधव, बाळासो शिंदे, जयंत जाधव, चंद्रकांत बोराटे, प्रतिभा पवार, रामचंद्र रूपनवर उपस्थित होते.























