माजी आयएएस अधिकारी माधवराव सांगळे यांचे निधन
पुणे : माजी आयएएस अधिकारी, सामाजिक बांधिलकी जपणारे माजी आयएएस अधिकारी माधवराव सांगळे यांचे निधन झाले. माधवराव सांगळे यांनी पुणे येथे
अपर जिल्हाधिकारी पुणे, अतिरिक्त जिल्हाधिकारी यूलसी, अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका याचबरोबर राज्य निवड मंडळाच ही जबाबदारी त्यांनी पार पाडली होती.
त्यांचे मूळगाव केहाळ (ता. जिंतूर, जि. परभणी) येथे होते.
त्यांच्या मागे दोन मुले आणि मुलगी, पत्नी असा परिवार आहे. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव राजेश सांगळे हे जीएसटी विभागात उपआयुक्त आहेत.























