Homeताज्या बातम्याराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा.

भोंदू बाबा खरात प्रकरण नडलं; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकरांचा राजीनामा  मुंबई प्रतिनिधी 

भोंदूबाबा खरातचे कनेक्शन आणि वाढलेली अडचण

काही दिवसांपूर्वी भोंदूबाबा अशोक खरात याला अटक झाल्यानंतर त्याचे आणि रुपाली चाकणकर यांचे संबंध असल्याचे अनेक पुरावे समोर आले होते. सोशल मीडियावर दोघांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे चाकणकर मोठ्या अडचणीत सापडल्या होत्या. महिलांचे शोषण करणाऱ्या व्यक्तीसोबत महिला आयोगाच्या अध्यक्षांची जवळीक असणे, हे सरकारसाठी देखील डोकेदुखी ठरले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी अत्यंत कडक भूमिका घेत चाकणकर यांना पद सोडण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते.                                               पक्षांतर्गत नाराजी आणि सत्तेतील दबाव

रुपाली चाकणकर यांच्यावर केवळ मुख्यमंत्र्यांनीच नाही, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. महायुती सरकारमधील महत्त्वाच्या नेत्यांनी या प्रकरणात चाकणकर यांची बाजू घेण्यास नकार दिला. चहूबाजूंनी कोंडी झाल्यामुळे चाकणकर यांच्यासमोर राजीनामा देण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. अखेर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपले राजीनामा पत्र सुपूर्द केले आहे.

राजीनाम्यात दिले ‘वैयक्तिक’ कारण

रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात हा राजीनामा वैयक्तिक कारणास्तव आणि स्वेच्छेने देत असल्याचे म्हटले आहे. 15 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांची या पदावर नियुक्ती झाली होती. आपल्या पत्रात त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आणि सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. मात्र, राजकीय वर्तुळात हा राजीनामा खरात प्रकरणामुळेच घेतल्याची चर्चा रंगली आहे. अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात घेतलेले हे मोठे वळण मानले जात आहे.                                    वाचा रुपाली चाकणकर यांचे राजीनामा पत्र प्रति,

मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

विषय: अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्वीकारणेबाबत माननीय महोदय,

मी, सौ. रुपाली निलेश चाकणकर, वरील विषयान्वये आपणांस विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की, दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा ह्या पत्राद्वारे आपणांस सादर करत आहे. आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे. भविष्यातही आपले असेच सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. तरी आपण माझा अध्यक्षा, राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी आपणांस नम्र विनंती आहे. धन्यवाद…!

RELATED ARTICLES
- Advertisment -
सह्याद्रि प्राइम टाइम न्यूजसह्याद्रि प्राइम टाइम न्यूजसह्याद्रि प्राइम टाइम न्यूजसह्याद्रि प्राइम टाइम न्यूजसह्याद्रि प्राइम टाइम न्यूजसह्याद्रि प्राइम टाइम न्यूज

Most Popular

सह्याद्रि प्राइम टाइम न्यूजसह्याद्रि प्राइम टाइम न्यूजसह्याद्रि प्राइम टाइम न्यूजसह्याद्रि प्राइम टाइम न्यूजसह्याद्रि प्राइम टाइम न्यूजसह्याद्रि प्राइम टाइम न्यूज

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1775889305.328f2765 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1775871254.31d6ee1e Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1775853160.310e7ed4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1775835094.2f574cc1 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1775817025.2de39e0b Source link

error: Content is protected !!