माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्याकडून फड कुटुंबियांचे सांत्वन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – शुभम पालवे
तालुक्यातील कन्हेरवाडी येथील युवक नेते माणिकभाऊ फड यांचे चुलत बंधू
सोसायटीचे व्हाईस चेअरमन नाथराव भाऊ फड यांचे दि.२१ जानेवारी २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. यांच्या दुःखद निधनाबद्दल माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी दि.२५ रोजी कन्हेरवाडी येथील निवासस्थानी जावुन फड कुटुंबियांची भेट घेवुन सांत्वन केले. तसेच कै. नाथराव फड यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
नाथराव भाऊ हे कन्हेरवाडी येथील मनमिळावू व्यक्तिमत्व होते एक चांगलं व्यक्तिमत्व हरपल अशा शब्दात माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
यावेळी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या समवेत परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. संचालक माणिकभाऊ फड,उपनगराध्यक्ष राजाखान पठाण, नगरसेवक निळकंठ भाऊ चाटे, पवन मुंडे, लक्ष्मण मुरकुटे, बालाजी फड, व्यपारी महासंघाचे अध्यक्ष माऊली फड, जहागीर भाई समाधान मुंडे, विकास मुंडे, बालाजी गित्ते जयदत्त नरवटे यांच्यासह कार्यकर्तेनी फड कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी संतोष फड, बबलू फड व फड कुटुंबिय उपस्थित होते.























