सारा 18व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये चाकणचे 56 विद्यार्थी विजेते
चाकण प्रतिनिधी
दि. 24 फेब्रुवारी
आंतरराष्ट्रीय अबॅकस गणित महामंडळ भारत आणि तैवान यांच्या संयुक्त विद्यमाने चाकण येथील संतोष ऑल राऊंडर अकॅडमी आणि सारा अबॅकस अकॅडमी मधून अबॅकस, वैदिक गणित, सुंदर हस्ताक्षर, चित्रकला, रोबोटिक्स आणि फोनिक्स या कोर्सेस मधून संपूर्ण भारतातून 4 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. सारा 18व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये 84 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी 41 विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय स्पर्धेच्या दुसऱ्या आणि फायनल राऊंडसाठी होऊन त्यापैकी 39 विद्यार्थी देशपातळीवर विजेते झाले. 17 विद्यार्थी विभागीय विजेते झाले.
अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी येथे नुकताच पार पडलेला 17वा राष्ट्रीय पारितोषिक वितरण समारंभ अर्थात कौतुक सोहळ्यामध्ये अध्यक्ष जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. अशोक जाधव व प्रा. अमोल फुंदे सर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया चाकण शाखेचे उपव्यवस्थापक इंद्रनील मोरे, संस्थेची विश्वस्त श्री. भास्करराव आव्हाड या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कठीण आणि क्लिष्ट उदाहरणे 100 गणिताची उदाहरणे तीन आणि पाच मिनिटांमध्ये सोडवायचे असतात. चाकण येथील विद्यार्थ्यांचा सराव प्राचार्या अर्चना प्रवीण आघाव, सहशिक्षिका संध्या जाधव, कविता बोडके, पल्लवी पवार, स्वाती धबाले, रूपाली पाटील, अपर्णा जायले, कृणाली पाटील या शिक्षकांनी घेतला. या कौतुक सोहळ्यामध्ये विद्यार्थी, पालकांनी स्पर्धेविषयीचे अनुभव सांगितले.
आंतरराष्ट्रीय अबॅकस गणित महामंडळाच्या अध्यक्ष प्राचार्या अर्चना प्रवीण आघाव यांना राष्ट्रीय पातळीवरील बेस्ट टीचर अवॉर्ड 2026, महामंडळाचे भारताचे प्रतिनिधी डॉ. प्रवीण आघाव यांना बेस्ट टीचर अवॉर्ड 2026 देण्यात आला. संतोष ऑल राऊंडर अकॅडमीला बेस्ट मॅनेजमेंट अवॉर्ड 2026 तसेच सारा अबॅकस अकॅडमीला देश पातळीवरील बेस्ट सेंटर अवार्ड 2026 देऊन सन्मानित केले. या पारितोषिक वितरण समारंभामध्ये चाकण आणि चाकण पंचक्रोशीतील विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते विजेत्या सर्व विद्यार्थ्यांवर सर्व स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष एरंडे यांनी केले, अशी माहिती अकॅडमीची डायरेक्टर डॉ. प्रवीण आघाव यांनी दिली.























