महायुती मित्रपक्ष बहुजन समता पार्टी कडून पत्रकार श्री देवा खरात यांना कुळधरण गणासाठी उमेदवारी जाहीर.
______________________
बहुजन समता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र सकटे प्रदेशाध्यक्ष. वसंतराव सकट यांनी महत्वपूर्ण विचारविनिमय करून निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे. फुले शाहू आंबेडकर चळवळीसाठी अहोरात्र लढणारे पत्रकार देवा खरात दलित आदिवासी भटके विमुक्त ओबीसी सर्वसाधारण कोणत्याही जाती धर्माचा ममत्व भाव न बाळगता तन-मन-धनाने काम करणारा कार्यकर्ता म्हणजे पत्रकार देवा खरात
कुळधरण गणातील सर्व गावातील वाड्या वस्तीवरील तांड्यावरील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या हक्काचं काम करून घेण्यासाठी व त्यांना प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम व त्यांना सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देणारा एकमेव कार्यकर्ता म्हणजे पत्रकार देवा खरात
त्यामुळे येणाऱ्या पुढील निवडणुकांमध्ये पंचायत समिती कर्जत कुळधरण गणांमधून महायुती मित्रपक्ष बहुजन समता पार्टी यांच्याकडून पत्रकार देवा खरात जाहीर निवडणूक लढणार आहेत.























