आद्य क्रांतिकगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या 231 व्या जयंतीनिमित्त लहुजी शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले
पुणे जिल्हा प्रतिनिधी
कार्यक्रमाचे आयोजन संगम वाडी शाखेचे वतीने करण्यात आले होते.
समाजाचे ज्येष्ठ नेते क्रांतिवीर लहुजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर भाऊ तडाखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे डॉ. गायकवाड साहेब यांनी अभिवादन करून मार्गदर्शन केले तसेच गरवारे कॉलेजचे प्राध्यापक विनोद जी सूर्यवंशी सर यांनी देखील मार्गदर्शन केले तसेच समाजाचे जेष्ठ नेते गोविंद साठे साहेब यांनी देखील मार्गदर्शन केले यावेळी लहुजी शासन ग्रुप संस्थापक अध्यक्ष सनी भाऊ डाडर, यांनी अभिनंदन करून सर्वांचे स्वागत केले तसेच यावेळी शिवसेना युवा नेते बापू साहेब कसबेकर, लहुजी शासन राष्ट्रीय अध्यक्ष मोहन दादा वाघमारे, यांनी सर्वांचे आभार मानले,आलेल्या सर्व मान्यवरांचे आदरपूर्वक सत्कार करण्यात आले, तसेच वडगाव शेरी मतदारसंघ अध्यक्ष पदी निखिल शेंडगे यांची निवड करण्यात आली, कोथरूड महिला अध्यक्ष पदी अर्चना खुडे यांची निवड करण्यात आली, यावेळी पुणे शहर सचिव विनायक भाऊ भिसे, विश्व मातंग संघटनेचे श्रीकांत भाऊ भिसे, छत्रपती शिवाजीनगर मतदार संघ अध्यक्ष सागर नेटके, उपाध्यक्ष उमेश नाडे, संघटक आकाश नेटके, सदस्य राजाभाऊ शिंदे, संघटक ऋतीक जाधव, बाळू भाऊ घाटूळ, आकाश कांबळे, तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
लहुजी शासन संघटनेचे वतीने नांदेड, यवत, पुणे, कर्जत, श्रीगोंदा, संभाजी नगर, पिंपरी चिंचवड, ठिकाणी देखील जयंती साजरी करण्यात आली. एकाच शासन लहुजी शासन,























