रविवार दिनांक 19/04/2026 रोजी जय हनुमान व श्री भैरवनाथ यात्रा उत्सव
जय हनुमान व श्री भैरवनाथ यात्रा उत्सव निंबोडी ता. इंदापूर, जि. पुणे उत्सव रविवार दि. 19/04/2026 रोजी दुपारी 2:00 वाजता श्री भैरवनाथाचा कलशारोहनाचा कार्यक्रम ह.भ.प. चैतन्य महाराज कोकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल.
व
सोमवार दि.20/04/2026 रोजी दुपारी 12:00 वा – भैरवनाथ व जोगेश्वरी यांचा लग्नसोहळा
दुपारी 1:00 वा – महाप्रसादाचा कार्यक्रम होईल श्री ह.भ.प. सुधाकर महाराज जगदाळे व समस्त जगदाळे परिवार यांचे वतीने महाप्रसाद होईल.
सायं 5:00 वा श्रींच्या भव्य दिव्य असा छबीन्याचा कार्यक्रम रात्री 9:00 वा कैलास सावेत गौतंडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा कार्यक्रम मंगळवार दि 21/04/26 रोजीसकाळी 9:00 वा हजरीचा कार्यक्रम होईल.दुपारी 12 ते 4
भव्य दिव्य असा भेदिकाचा कार्यक्रम होईल
. श्री. लव्ह दादा कदम तानू व भाऊ बापू मांडवे सोलापूर यांचा भेदीकाचा कार्यक्रम होईल.
दुपारी 4ते 7 – नेमलेल्या कुस्त्या होतील. रात्री 9:00 वा खास महिला भगिनींसाठी सौ. सुजाता भाटे निर्मिती ऑर्केस्ट्रा दंगल हिंदी मराठी गाण्यांचा बहरदार असा कार्यक्रम होईल तरी पै-पाहणे आप्तेष्ट व सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी. नम्र विनंती
आपले जय हनुमान व श्री भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटी व समस्त ग्रामस्थ निंबडी























