महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शर
सातारा जिल्हा प्रतिनिधी
फलटण येथे महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
संबंधित डॉक्टर महिलेने आपल्या हातावर पीएसआय गोपाळ बदने याने चार वेळा अत्याचार केल्याचे तर प्रशांत बनकर याने मानसिक छळ केल्याचे लिहिले होते.
या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ उडाली. आरोपी पीएसआय बदने हा या घटनेनंतर फलटणमधून पसार झाला होता. त्याच्या शोधासाठी फलटण पोलिस व सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके बीड, पुणे, पंढरपूर आधी ठिकाणी रवाना केली होती.
शुक्रवारी दिवस आणि रात्र पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा गोपाळ बदने हा फलटण शहर पोलिस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या अटकेची कारवाई सुरू केली. बदने पोलिस ठाण्यात हजर झाल्याचे समजतात फलटणमधील नागरिकांनी पोलिस ठाण्याकडे धाव घेतली.
या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तातडीने बंदोबस्त तैनात केला.























