Homeताज्या बातम्यागणेश उत्सव काळामध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमास वालचंदनगर पोलीसांनी केले जेरबंद.

गणेश उत्सव काळामध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमास वालचंदनगर पोलीसांनी केले जेरबंद.

गणेश उत्सव काळामध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमास वालचंदनगर पोलीसांनी केले जेरबंद

वालचंदनगर प्रतिनिधी :-हेमंत थोरात

आरोपीकडुन जप्त केला दोन किलो गांजा

मा. संदीपसिंह गिल्ल सो, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, तसेच मा. गणेश बिरादार सो अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग व मा. सुदर्शन राठोड सो उपविभगीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग यांनी श्री गणेश उत्सव 2025 च्या अनुषंगाने घेतलेल्या बारामती मध्ये घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये गणेश उत्सव बंदोबस्त तसेच अवैध धंदे कारवाईच्या दिलेल्या सुचनांप्रमाणे पोलीस स्टेशन हददीमध्ये कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशन हददीत दररोज पेट्रोलिंग करत आहोत. दिनांक 04/09/2025 रोजी अवैध धंदावर कारवाई करणेसाठी पेट्रोलिंगसाठी रवाना झालेलो

असताना गोपनीय माहिती मिळाली की, मौजे निमसाखर, ता. इंदापुर गावचे हददीमध्ये गायरान मधील महादेव मंदीर जवळ तसेच परिसरामध्ये इसम नामे शुभम निगडे हा स्वतःच्या आर्थिक फायदासाठी त्याच्याकडील अंमली पदार्थ गांजा विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावेळी मिळालेल्या माहिती प्रमाणे सदर इसमांवर कारवाई करण्यासाठी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो, बारामती विभाग यांची कारवाई करणेबाबत लेखी परवानगी घेवुन कारवाईसाठी सक्षम अधिकारी तसेच दोन शासकीय पंच, फोटो ग्राफर व वजनकाटा धारक यांना बोलावुन घेवुन त्यांना मिळालेल्या माहितीचा आशय सांगुन मिळालेल्या बातमी प्रमाणे सदर ठिकाणी जावुन सापळा रचला. त्यावेळी कळंब कडुन निमसाखर दिशेने जात असताना एक दोन चाकी गाडी दिसली.

त्यावेळी सदर इसमास थांबविले असता मिळालेल्या माहिती मधील इसम हाच असल्याची खात्री झाल्याने सदर इसमास ताब्यात घेवुन त्यास नाव व पत्ता विचारले असता त्याने आपले नाव शुभम वामन निगडे, वय 24 वर्षे, रा. मौजे निरवांगी, ता. इंदापुर, जि. पुणे असे सांगितले. त्यावेळी सदर इसमाच्या गाडीची झडती घेतली असता त्याच्या मध्ये अंमली पदार्थ गांजा मिळुन आला.

त्यावेळी सदर गांजाची सक्षम अधिकारी व पंचासमक्ष वजन केले असता 2.080 किलो अंमली पदार्थ गांजा मिळुन आला. त्यानंतर सदर अंमली पदार्थ गांजा हा सक्षम अधिकारी व पंचा समक्ष पंचनामाव्दारे जप्त करण्यात आला.

त्यानंतर इसम शुभम निगडे याच्याकडे अंमली पदार्थ गांजा कोठुन आणला याबाबत तपास केला असता त्याने सदरचा अंमली पदार्थ गांजा हा इसम नामे अक्षय बाळासो कदम, रा.कुरबावी, ता. माळशिरस, जि. सोलापुर याच्याकडुन विक्रीसाठी घेतला असल्याचे सांगितले. त्यानंतर सदर इसमास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे आणले.

त्यानंतर सदर घटनेच्या अनुषंगाने वालचंदनगर पोलीस स्टेशन गु रजि. नंबर 292/2025 एन. डी.पी.एस अॅक्ट कलम 8 (क), 20(ब)ii, 29 प्रमाणे इसम नामे शुभम वामन निगडे, वय 24 वर्षे, रा. मौजे निरवांगी, ता. इंदापुर, जि. पुणे व अक्षय बाळासो कदम, रा.कुरबावी, ता. माळशिरस, जि. सोलापुर यांचेवर गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हामधील दोन्ही आरोपींना अटक केली

असुन मा. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दिनांक 09/09/2025 रोजी पर्यंत पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली असुन सदर आरोपींवर या अगोदर अशा प्रकारचे गुन्हे कोठे दाखल आहेत का तसेच त्यांनी सदर गांजा कोठुन आणला या अनुषंगाने या अनुषंगाने सदर गुन्हयाचा तपास हा विजय टेळकीकर, पोलीस उप-निरीक्षक, वालचंदनगर पोलीस स्टेशन हे करत आहेत.

सदरची कामगिरी मा. संदीपसिंह गिल्ल सो, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा गणेश बिरादार सो, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, व मा. डॉ सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सपोनि राजकुमार डुणगे, पोलीस उप-निरीक्षक विजय टेळकीकर, पोलीस हवालदार गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, गणेश काटकर, विकास निमळ, सचिन जमदाडे, अभिजीत कळसकर, विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, होमगार्ड किरण पेडकर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जबरा इव्होल्व 2 75 पुनरावलोकन: तरीही सर्वोत्तम ‘बँग फॉर युवर बक’ ऑफिस हेडसेट?

जबरा इव्हॉल्व्ह 2 75, डॅनिश कंपनीची नवीनतम ऑन-इअर ॲडिशन तिच्या इव्हॉल्व्ह हेडफोन्स लाइनअपमध्ये अलीकडेच भारतात लॉन्च झाली आहे. नवीन हेडफोन भारतात रु.च्या खाली किरकोळ...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.dda0d517.1777281692.4df041c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777263653.2aebf270 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777245597.29ad80f9 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.dda0d517.1777227455.25431517 Source link

जबरा इव्होल्व 2 75 पुनरावलोकन: तरीही सर्वोत्तम ‘बँग फॉर युवर बक’ ऑफिस हेडसेट?

जबरा इव्हॉल्व्ह 2 75, डॅनिश कंपनीची नवीनतम ऑन-इअर ॲडिशन तिच्या इव्हॉल्व्ह हेडफोन्स लाइनअपमध्ये अलीकडेच भारतात लॉन्च झाली आहे. नवीन हेडफोन भारतात रु.च्या खाली किरकोळ...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.dda0d517.1777281692.4df041c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777263653.2aebf270 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777245597.29ad80f9 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.dda0d517.1777227455.25431517 Source link
error: Content is protected !!