चारित्र्याचा संशयावरुन पत्नीचा खुन करणा-या नराधम पतीस वालचंदनगर पोलीसांनी केले तात्काळ जेरबंद.
वालचंदनगर प्रतिनिधी
दिनांक २३/१२/२०२५ रोजी सकाळी ०५/३० वा. सुमारास मौजे शेळगांव, ता. इंदापुर येथील इसम नामे मल्हारी रोहिदास खोमणे याने त्यांची पत्नी नामे मनिषा मल्हारी खोमणे, वय ३५ वर्षे, रा. शेळगांव, ता. इंदापुर ही सकाळी अंघोळीसाठी चुलीवरती पाणी गरम करत असताना इसम नामे मल्हारी रोहिदास खोमणे याने पत्नी मनिषा खोमणे यांचेवर चारित्र्यावर संशय घेवून त्यांचे सोबत वाद घालुन चुलीमध्ये जळणारे मोठे लाकडी दांडके घेवुन
त्याच लाकडी दांडक्याने पत्नी मनिषा खोमणे हिच्या डाव्या हाताच्या दंडावर, पोटरीवर तसेच डोक्यामध्ये चार ते पाच वेळा जोरात मारुन तिला रक्तबंबाळ करुन तिचा खुन केला.
त्यानंतर मल्हारी खोमणे याने स्वतःचा ठावठिकाणा कोणाला समजू नये यासाठी स्वतःचा मोबाईल हा घरामध्ये ठेवून तो त्याच्याकडील चार चाकी गाडीने पळुन गेला होता.
त्यावेळी सदर महिला नामे मनिषा मल्हारी खोमणे यांना उपचारकामी त्यांचे नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालय, इंदापुर येथे नेले आले असता त्यांचा उपचारापुर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन घोषित केले.
स्यानंतर सदर घडलेल्या घटनेची माहिती वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजकुमार दुणगे यांना प्राप्त होताच त्यांनी पोलीस स्टाफसह लागलीच घटनास्थळी भेट देवून घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती मयताच्या नातेवाईकांकडून व जमलेल्या लोकांकडुन घेण्यात आली.
त्यानंतर सदर घटनेच्या अनुषंगाने मयत महिला यांची आई नामे श्रीमती बबई भिमराव मदने, वय ६० वर्षे, रा. शेळगांव, ता. इंदापुर, जि. पणे यांच्याकडे घटनेची सविस्तर चौकशी करून त्यांची लेखी फिर्याद घेवून गुन्हा रजि. नंबर ४१७/२०२५ बी.एन.एस १०३(१) ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
त्यानंतर सदर घटनेची माहिती मा. पोलीस अधिक्षक सो, पुणे ग्रामीण तसेच मा अपर पोलीस अधिक्षक साो, पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, बारामती उपविभाग व मा. पोलीस निरीक्षक सतो. स्थानिक गुन्हे शाखा यांना देवुन त्यांच्या मार्गदर्शन व सुचने प्रमाणे पत्नीस मारहाण करणारा आरोपी याचा शोध घेण्यासाठी बालचंदनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथक व पोलीस अंमलदार यांचे वेगवेगळी तीन पथके तयार करुन रवाना केले. त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे सदर आरोपी हा जेजुरी येथे असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त होताच
सदर आरोपीचा मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध घेत असताना सदर आरोपीस पोलीस आल्याची चाहुल लागताच तो त्याच्याकडील चार चाकी वाहनामध्ये बसुन वेगाने पळून जावु लागला. त्यावेळी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीसांनी त्याचा शिताफीने बाहनामधुन पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव मल्हारी रोहिदास खोमणे, वय ३५ वर्षे, रा. शेळगांव, ता. इंदापुर, जि. पुणे असे सांगितले.
त्यानंतर त्यास वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे आणुन त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्हायाची त्यास माहिती देवून त्यास दाखल गुन्हामध्ये दिनांक २३/१२/२०२५ रोजी १९/४५ वाजता अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीस आज रोजी रिमांडकामी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो, इंदापुर कोर्ट, इंदापुर यांचे समक्ष हजर केले
असता सदर आरोपीस दिनांक २९/१२/२०२५ रोजी पर्यंत ०५ पोलीस कोठडी देण्यात आली असून सदर गुन्हयाचा तपास हा राजकुमार गुणगे, सहा. पोलीस निरीक्षक, वालचंदनगर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हे करत आहेत.
सदरची कामगिरी मा.श्री. संदीपसिंह गिल्ल सो, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मा.श्री. गणेश बिरादार सो, अपर पोलीस अधिक्षक, पुणे विभाग, मा.श्री. डॉ. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, मा.श्री अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे राजकुमार बुणगे सहा. पोलीस निरीक्षक, विजय टेळकीकर पोलीस उप-निरीक्षक, मिलीद मिठापल्ली, ग्रेड पोलीस उप-निरीक्षक रतिलाल चौधर तसेच गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, दत्तात्र्य चांदणे, जगदीश चौधर, दादासाहेब बोईफोडे, विकास निर्मळ, महेश पवार, अजित थोरात, गणेश काटकर, किर्तीलाल गायकवाड, रविंद्र पाटमास, विक्रमसिंह जाधव, राहुल माने, गणेश बानकर, ज्योती दिसले यांनी पार पाडली आहे.





















