परमेश्वराने दिलेला वेळ सत्कारणी लावा : इंजिनीअर अरविंद खेडकर
चाकण : प्रतिनिधी
दि. 7 ऑक्टोबर
पालकांनी विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष द्यावे. स्वतःच्या मुलाची तुलना इतर मुलांची करू नये. परमेश्वराने जो प्रत्येकासाठी वेळ दिला आहे
त्या वेळेचा चांगला सदुपयोग करण्याची सवय पालकांनी विद्यार्थ्यांना लावावी. विचारावर कसे नियंत्रण करता येईल हे शिकवावे यातूनच विद्यार्थ्यांचे भविष्य ठरणार आहे
असे महत्वपूर्ण मार्गदर्शन 16व्या कौतुक सोहळ्याचे अध्यक्ष इंजिनियर अरविंद खेडकर यांनी केले.
श्री. खेडकर हे चाकण पंचक्रोशीतील प्रसिद्ध इंजिनिअर, आर्किटेक्ट, वास्तू संरचनाकार आहेत.
चाकण येथील संतोष ऑल अकॅडमी आणि सारा अबॅकस अकॅडमी येथे इंटरनॅशनल अबॅकस मॅथेमॅटिक्स असोसिएशन भारत आणि तैवान आयोजित अबॅकस 78 व्या आंतरराष्ट्रीय परीक्षेमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ अर्थात 16 कौतुक सोहळा चाकण येथे संपन्न झाला.
अबॅकस कोर्सच्या 78व्या आंतरराष्ट्रीय परीक्षेमध्ये चाकण येथील 51 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्व विद्यार्थी प्रथम, द्वितीय,तृतीय चतुर्थी श्रेणीतून चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाले विजेते झाले. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. चाकण येथील अकॅडमीला बेस्ट सेंटर अवॉर्ड 2025 डॉ. प्रविण आघाव यांना मिळाला. स्वाती धबाले, संध्या जाधव आणि प्राचार्या अर्चना प्रविण आघाव यांना बेस्ट टीचर अवॉर्ड 2025 मिळाला.
कौतुक सोहळ्याच्या निमित्ताने पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अबॅकसच्या 78 व्या आंतरराष्ट्रीय परीक्षामधील विजेत्या विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
प्रदर्शन प्रदर्शन प्राचार्या अर्चना प्रवीण आघाव यांनी केले. उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री. संतोष एरंडे यांनी केले. अशी माहिती अकॅडमीचे डायरेक्टर डॉ. प्रविण आघाव यांनी दिली.























