कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी असल्याने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केल होती.
पुणे जिल्हा प्रतिनिधी
पहाटे पुजारी राहुल आगलावे यांच्या हस्ते
श्रींची पूजा करण्यात आली. चिंचवड देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा करण्यात आली यावेळी विश्वस्त मा. श्री केशव उमेश विद्वांस उपस्थित होते. देवस्थान तर्फे मंदिर प्रांगण आणि मंदिराबाहेर मांडव घालण्यात आले होते,
दर्शनबारी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी देवस्थान तर्फे भाविकांना उपवासाची खिचडी वाटण्यात आली. सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळ यांचे साथीने ह.भ. प. श्री विष्णू महाराज जेठे, जालना यांचे सुभाष्य कीर्तन झाले, चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना निघला त्यांनतर उपस्थित भाविकांना ग्रामस्थांतर्फे महाप्रसाद देण्यात आला.
जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्याने देवस्थान तर्फे जादा सुरक्षा व्यवस्था करण्यात केली होती. ग्रामपंचायती तर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. देवस्थानचे विश्वस्त मा. श्री केशव उमेश विद्वांस लक्ष ठेवून होते.























